VIDEO : तीन कृषी कायद्यांसदर्भात नेमकं काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी? - PM Narendra Modi
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वादग्रस्त तिन्ही कृषी कायदे (3 Farm laws to be repealed) मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार संसदेच्या आगामी अधिवेशनात हा निर्णय घेणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सकाळी ९ वाजता देशाला संबोधित करताना दिली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारने शेती आणि शेतकऱ्यांसाठी केलेल्या योजना आणि मदतीचा उल्लेख केला. पाहा, काय म्हणाले पंतप्रधान मोदी.