पाण्यावरून हवेत तयार झाला 40 फुट उंचीचा भोवरा, पाहा VIDEO - मंझावली गाव फरिदाबाद
फरिदाबाद(हरियाणा) : हरियाणाच्या फरिदाबादमधील मंझावाली या गावातून वाहणाऱ्या यमुनेच्या पाण्यावरून जाणाऱ्या चक्रीवादळामुळे आकाशाच्या दिशेने पाण्याचा मोठा भोवरा तयार झाल्याचे चित्र बघायला मिळाले. या अनोख्या भोवऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नदीपात्रातील पाण्यापासून तीस ते चाळीस फुट उंचीपर्यंत हा भोवरा गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.