VIDEO : हैदराबादमध्ये बिबट्या अन् ब्लॅक पँथरचा मुक्त संचार.. पहा व्हिडिओ - हैदराबाद बिबट्या व्हिडिओ
लॉकडाऊनमुळे रस्त्यांवर माणसांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळेच की काय, वन्य प्राणी मुक्तपणे रस्त्यांवर फिरताना दिसून येत आहेत. हैदराबादमध्ये आज दोन वेगवेगळ्या ठिकाणी एक ब्लॅक पँथर, तर एक बिबट्या असाच वावरताना दिसून आला. मैलारदेवपल्ली भागामध्ये रस्त्याच्या मधोमध बसलेला बिबट्या हा जखमी वाटत होता. त्याला सुरक्षितपणे जंगलात नेऊन सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, दुसरीकडे गोलकोंडाच्या फतेहदरवाजा भागामध्ये एका इमारतीवर एक ब्लॅक पँथर चढताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे..