महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

Exclusive Interview : जगातील सर्वात स्वस्त कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे भारत बायोटेकचे लक्ष्य - डॉ. कृष्णा इला न्यूज

By

Published : Jul 2, 2020, 2:07 AM IST

Updated : Jul 2, 2020, 10:21 AM IST

हैदराबाद - कोरोना विषाणूमुळे संपूर्ण जग त्रस्त झाले आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी औषध तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान, भारत बायोटेकने 'कोव्हॅक्सीन' या नावे स्वदेशी लस तयार केली आहे. या लसीला भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) ने मानवी चाचण्या घेण्यास परवानगी दिली आहे. या संदर्भात ईटीव्ही भारतशी, भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर कृष्णा ईला यांनी मुलाखत दिली. यात त्यांनी लस विकसित करताना आलेली आव्हाने, चाचण्या आणि लसीबद्दल बऱ्याच मुद्यावर भाष्य केले. आपण लसीच्या यशस्वी प्रयोगाच्या जवळ असल्याचे ईला म्हणाले. तसेच त्यांनी पुढील वर्षापर्यंत 1.3 बिलियन लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे शक्य असल्याचे सांगितले. दरम्यान, जुलैपासून भारतात कोव्हॅक्सीनच्या चाचण्या सुरु होतील. पाहा डॉ. कृष्णा इला यांची संपूर्ण मुलाखत...
Last Updated : Jul 2, 2020, 10:21 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details