VIDEO : भरदिवसा रस्त्यावर तरुणाला मारहाण; विव्हळत होता तब्बल 1 तास - लुधियाना तरुण मारहाण व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
चंदीगड - पंजाबच्या लुधियानामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाला काही जणांनी भर रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली. दिवसा ढवळ्या झालेल्या या घटनेचे साक्षीदार तर अनेक होते, मात्र या दुर्दैवी तरुणाच्या मदतीला कोणीही आले नाही. तब्बल तासभर तो तसाच रस्त्यावर तडफडत होता. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार बाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. याबाबत पोलीस तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी इंद्रजीत सिंग यांनी दिली आहे...