VIDEO : दिल्ली धार्मिक दंगलीच्या कटू आठवणी - दिल्ली दंगल बातमी
एक वर्षापूर्वी राजधानी दिल्लीत उसळलेल्या धार्मिक दंगलीत रस्त्यांवर रक्त सांडले. या दंगलीत ५३ जणांनी जीव गमावला तर अनेक जण जखमी झाले. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी विरोधात दिल्लीत धरणे आंदोलन सुरू होते. याला काही कट्टरतावाद्यांचा विरोध होता. या आंदोलनात आघाडीवर मुस्लिम समुदाय होता. शाहीन बाग हे आंदोलनाचे केंद्र बनले होते. एकमेकांविरोधातील राग, द्वेष, कट्टरतावाद वाढत गेला. देश के गद्दारोंको, गोली मारो *** असे नारे दिले गेले. याचे पर्यावसन दंगलीत झाले. दगडफेक, जाळपोळ, गोळीबार, मारहाण झाली. ईशान्य दिल्लीतून धुराचे लोट निघाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला.