Viral Video : आंदोलक शेतकऱ्यांसाठी दारूही दान करा, काँग्रेस नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य - हरयाणामधील काँग्रेस नेत्या विद्या राणी दानोडा
नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यातच हरयाणामधील काँग्रेस नेत्या विद्या राणी दानोडा यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ज्याला जसे जमेल. तसे त्याने दान करावं. पैसे, भाजी, तूप आणि दारूचेही दान करावं. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे त्या म्हणाल्या. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे.