VIDEO : पूर असतानाही पूल ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहून गेला वृद्ध, पाहा पुढे काय झाले - पूल ओलांडताना वाहून गेला व्यक्ती
रायसेन(raisen): मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील बेगमगंज ठाणे हद्दीतील बरखेडा घाट येथे पूल ओलांडण्याचा प्रयत्न करताना एक वृद्ध व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वीणा नदीवरील पुलावरून पुराचे पाणी वाहत असतानाही हा वृद्ध पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतो. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो यात वाहून जात असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसते. सुदैवाने काही अंतरानंतर नदीच्या काठाला लागल्याने या व्यक्तिचे प्राण बचावले आहे. मात्र अशा पद्धतीने पूल ओलांडणे जीवावर बेतू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत जीव धोक्यात न घालता पूर ओसरण्याची वाट बघणे कधीही चांगले असा सल्ला दिला जात आहे.