Video : मध्य प्रदेशमध्ये पावसाचं रौद्ररूप; सिंध नदीच्या प्रवाहात संकुआनवरील पूल गेला वाहून - मध्य प्रदेश पाऊस न्यूज
दतिया जिल्ह्यातील रतनगढमध्ये पावसाने कहर घातला आहे. सिंध नदीच्या जोरदार प्रवाहात संकुआनवरील पूल वाहून गेला. हा पूल सिंध नदीवर बांधण्यात आला होता. सिंध नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने ही घटना घडली. सिंध नदीचे हे भयंकर रूप पाहून परिसरात भीतीचे वातावरण आहे. सिंध नदीच्या वाढलेल्या पाण्याच्या पातळीने अनेक वर्षांचे रेकॉर्ड तोडले आहेत. हा पूल कोसळल्यामुळे दातियाचा भिंड आणि ग्वाल्हेरशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे.