हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची भाजप नेत्याला मारहाण; पाहा व्हिडिओ.. - भोपाळ भाजप नेता मारहाण
भोपाळ : मध्य प्रदेशच्या राजधानीमध्ये हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी भाजप नेत्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजप नेते निलेश हिंगोरानी यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्चस्ववादातून ही मारहाण करण्यात आल्याचे बोलले जात आहे. यावेळी निलेश यांना बॅट आणि लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, याप्रकरणी तपास सुरू आहे. दरम्यान भाजपा नेत्याने दिलेल्या जवाबानुसार, दारुच्या पैशांसाठी ही मारहाण करण्यात आली. हे कार्यकर्ते त्यांना एक लाख रुपये मागत होते, असेही निलेश यांनी सांगितले..