काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO : पुराचा लोंढा, अन् जीव वाचवण्याची धडपड - उत्तराखंड हिमकडा कोसळल्याचा व्हिडिओ
डेहराडून - ७ फेब्रुवारीला उत्तराखंडमध्ये हिमस्खलन होऊन अचानक पूर आला आणि होत्याचं नव्हतं झालं. रविवारी तपोवन उर्जा प्रकल्पाच्या बांधावर काम करणाऱ्या कामगारांना पुढील क्षणी आपल्या सोबत काय घडेल याची किंचितही माहिती नसेल. अचानक पाण्याचा लोंढा येतो आणि गवताच्या काडीसारखे कामगार त्यात वाहून जातात. उर्जा प्रकल्पाच्या बाधांवर काम करणारे कर्मचारी पाणी, चिखल, मातीचा लोंढा पाहून जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावतात. मात्र, त्यांना बाहेर पडता येत नाही. या घटनेचा व्हिडिओ ईटीव्ही भारतच्या हाती लागला आहे. ही हृदयद्रावक घटना पाहताना काळजाचा ठोका चुकतो.