नो टू सिंगल यूज प्लास्टिक : वाराणसी रेल्वेस्थानकाची पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल, पाहा खास रिपोर्ट - मातीचे कुल्हड
वाराणसी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, आता वाराणसीमधील रेल्वेस्थानक देखील पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाराणसी रेल्वे स्थानकावरील दुकानदारांना, रेल्वे प्रशासनाने प्लास्टिकचे ग्लास आणि प्लेट वापरण्याऐवजी मातीचे कुल्हड वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे, आजूबाजूच्या परिसरातील मातीची भांडी बनवणाऱ्या लोकांचे व्यवसायही तेजीत आले आहेत. रेल्वेस्थानकावरील रेल्वेमार्फत चालवली जाणारी आणि खासगी खाद्यपदार्थांची दुकानेही आता प्लास्टिकऐवजी मातीची भांडी वापरण्यावर भर देत आहेत. पाहूया 'ईटीव्ही भारत'चा हा विशेष रिपोर्ट...