शत्रुला धडकी : ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझच्या अद्ययावत मिसाईलची चाचणी
भुवनेश्वर - भारत-रशियाने संयुक्तपणे विकसित केलेल्या ब्रम्होस सुपरसॉनिक क्रूझच्या अद्ययावत मिसाईलची चाचणी सोमवारी घेण्यात आली आहे. ही चाचणी ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यालगत संरक्षण सुविधा केंद्रात घेण्यात आली आहे. अद्ययावत ब्रम्होस हे ४५० किमी अंतरावरील लक्ष्याचा भेद करू शकते. ब्राम्होस क्षेपणास्त्र हे भारत आणि रशियाने संयुक्तरित्या तयार केले आहे. सध्या हे क्षेपणास्त्र फक्त भारत आणि रशियाकडे आहे.
Last Updated : Jul 12, 2021, 9:15 PM IST