कोरोना आणि शेतकरी आंदोलनावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी चर्चा
केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी ईटीव्ही भारताने विशेष संवाद साधला. कोरोनाच्या तिसर्या लाटेपासून ते शेतकऱ्यांचे आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर चर्चा केली. कृषी कायदे रद्द करण्यात येणार नाहीत. मात्र, शेतकऱ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आम्ही तयार आहोत आणि कृषी कायद्यात काही कमी असेल, तर त्यांनी सांगावी, ते सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.