खऱ्या अर्थाने 'आत्मनिर्भर' असणारी ओदानथुरई पंचायत - कोइम्बतूर ओदानथुरई
कोइम्बतूर जिल्ह्यातील मेट्टूपालयमजवळ तामिळनाडूच्या ओदानथुराई गावात प्रवेश करताच पिण्याचे पाणी, वायू आणि सौरऊर्जेचे संच लावलेली एकसारखी घरं आपल्याला दिसून येतात. ही किमया आहे येथील पंचायतीचे माजी अध्यक्ष शनमुगम यांची. येथील गावासाठी त्यांनी पवनचक्की फार्म बनवले आहे. ज्यामधून दरवर्षी ८ लाख युनिट वीज तयार होते. या विजेचा वापर प्रामुख्याने गावातील लोकांसाठी होतो. तर उर्वरित वीज राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनीला विकली जाते. 'आत्मनिर्भर' असणं म्हणजे काय हे या गावाकडे पाहून आपल्याला कळतं. पाहुयात याच ओदानथुरई गावाची गोष्ट..