VIDEO - हिमाचल प्रदेशमध्ये 400 मीटर खोल दरीत कोसळली ट्रक, चालक-कंडक्टर सुखरुप - 400 मीटर खोल दरी
शिमला - हिमाचल प्रदेशातील करसोग जिल्ह्यातील कलंगार येथे ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. ट्रक अनियंत्रित होऊन दरीत 400 मीटर खोल कोसळला आहे. सुदैवाने चालक आणि कंडक्टर हे ट्रकमधून आधीच बाहेर पडले होते. त्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहे. अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत. रस्ता खचल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.