तिरुपती ट्रस्टकडून ऑनलाईन मोफत तिकिटे जारी; अर्ध्या तासात भाविकांकडून 2.88 लाख तिकिटे बुक - तिरुपती भाविक तिकीट बुकिंग
तिरुपती (अमरावती) - तिरुमला तिरुपती देवस्थानने ऑनलाईन सर्वदर्शन तिकीटे मोफत जारी केली. तिकीटे जारी होताच 2.88 तिकीटे बुक केली आहेत. त्यामुळे 35 दिवस मंदिरात येणाऱ्या भाविकांचा कोटा (क्षमता) संपला आहे. भाविकांच्या सोयीसाठी तिरुपती देवस्थानाच्या (टीटीडी) इतिहासात पहिल्यांदाच सर्वदर्शन तिकिटे ऑनलाईन जारी करण्यात आली. सर्वदर्शनचे काउंटर हे 26 सप्टेंबरपासून बंद करण्यात येणार आहे. कोरोनाच्या काळात एका दिवसात 8 हजार भाविकांनाच तिरुपतीचे दर्शन घेता येते.