महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

भयान दुष्काळ भोगणारे जसकांडी गाव, आता इतर गावांना करते पाण्याचे वाटप - juskandi Jharkhand

By

Published : May 28, 2021, 1:45 PM IST

जमशेदपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या सरजामदच्या जसकांडी गावात भीषण पाणीटंचाई होती. भूजल पातळी इतकी खाली गेली होती, की हातपंपातून एक थेंबही पाणी बाहेर पडत नव्हता. उन्हाळ्याच्या दिवसात विहिरी कोरड्या पडायच्या. पाण्यासाठी लोकांना दररोज लांब जावं लागायचे. पाण्याच्या या समस्येमुळे लोकांना पाण्याचे महत्त्व समजले आणि ते वाचविण्याचा प्रयत्न सुरू झाला. या प्रयत्नात टाटा स्टील ग्रामीण विकास संस्थेने त्यांना मदत केली. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेत पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा निर्णय घेतला. टाटांच्या सहकार्यानं गावकऱ्यांनी पावसाचं पाणी वाया जाण्यापासून रोखण्यासाठी योजना आखली. पाण्याचा थेंब न् थेंब वाचविल्यामुळे आता आता जसकांडी गावाच्या महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत नाही. पाणी साठवण्याचा उपक्रम राबवणारं हे गाव बाकीच्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. हा उपक्रम राबवून आजूबाजूच्या अनेक गावातील लोकांची पाण्याच्या समस्या सुटली असून दरवर्षी लाखो लिटर पावसाचं पाणी वाया जाण्यापासून वाचवलं जातंय.

ABOUT THE AUTHOR

...view details