शिवमोगामधील सरकारी कार्यालयांच्या भिंती ठरतायत पर्यटकांसाठी खास आकर्षण! - painting government offices walls Shivamogga karnatak
कर्नाटकमधील शिवमोगा जिल्हा हा तेथील हिरवळीसाठी ओळखला जातो. ठिकठिकाणी असलेल्या झाडांमुळे या शहराला वेगळीच शोभा आली आहे. मात्र, या शहरात सार्वजनिक भिंतींवर लावण्यात आलेल्या पोस्टर्समुळे शहराची ही शोभा कमी होत आहे. या भिंती शहराला विद्रूप करण्याचे काम करत आहेत. हे लक्षात येताच, शिवमोगा महानगरपालिकेने आता या भिंती रंगवण्यासाठी कंबर कसली आहे. नव्याने रंगवण्यात आलेल्या या भिंती आता सगळ्यांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत