हाथी खेडा ठाकूर : देव नसलेले मंदिर! - हाथी खेडा ठाकूर मंदिर व्हिडिओ
🎬 Watch Now: Feature Video
हैदराबाद - झारखंडच्या पूर्व सिंहभूम जिल्हा मुख्यालयापासून ५० किलोमीटर अंतरावर हाथी खेडा ठाकूर नावचे एक मंदिर आहे. या मंदिरात कुठल्याही देवतेची पूजा केली जात नाही. येथे हत्तींची पूजा केली जाते. मंदिर परिसरात हत्तींच्या अनेक मूर्ती आहेत. यामागे अतिशय रंजक गोष्ट आहे. असे म्हटले जाते, एकेकाळी या परिसरात हत्तींचा प्रचंड वावर होता. दलमाच्या जंगलातून येणारे हत्ती शेतीचे आणि गावाचे मोठ नुकसान करत. त्यामुळे गावातील पुजाऱ्याने हत्तीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करण्यास सुरुवात केली.