मानवी मुंडके हातात घेऊन जाणाऱ्या साधुंचा व्हिडिओ व्हायरल, मानवी मांस खाल्ल्याचा पोलिसांना संशय - मानवी मुंडके
चेन्नई (तामिळनाडू) - मानवी मस्तक घेऊन जाणाऱ्या काही समियादी यांनी (स्थानिक साधू) यांनी नरमांस खाल्ल्याचा धक्कादायक दावा करण्यात येत आहे. ही घटना टेनकासी जवळील कल्लुरनी गावात घडली आहे. मानवी मस्तक घेऊन जाणाऱ्या काही समियादींचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी सख्ती पोथी सुदलाई मदास्वामी मंदिरातील काही समियादींना अटक केली आहे. कोणाचे नरमांस खाल्ले याबाबत पोलीस तपास करत आहेत. समियादीने मृतदेह हा मंदिरातील भाविकाकडून घेतल्याचे सांगितले. त्याबाबत अधिक माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले. 2019 मध्ये काही समियादींनी मंदिरातून मानवी मस्तक हातात आणले होते. ही घटना उत्सवादरम्यान घडली होती. पोलिसांनी समियादी आणि मंदिर प्रशासनातील व्यक्तींसह दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.