भारतीय वंशाची सिरिशा बांदला 'व्हर्जिन गॅलक्टिक' यानातून घेणार अंतराळात झेप - Telugu origin girl Sirisha Bandla
हैदराबाद - कल्पना चावला व सुनिता विल्यम्स यानंतर आणखी भारतीय मुलगी अंतराळ विश्वात इतिहास रचणार आहे. व्हर्जिन गॅलक्टिक या खासगी अंतराळ एजन्सीने युनिटी २२ या अंतराळयानाने अवकाशात झेप घेण्याचे जाहीर केले आहे. ही घोषणा कंपनीचे मालक सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी केली आहे. अंतराळ मोहिमेत त्यांच्यासोबत तीन व्यक्ती अंतराळ प्रवास करणार आहेत. यामध्ये मूळ भारतीय असलेल्या सिरिशा बांदलाचा समावेश आहे.