तेलंगणातील महिलांची सामूहिक 'रेशीम शेती' - Telangana collective silk farming
हैदराबाद - तेलंगणाच्या सूर्यापेट जिल्ह्यातील नादिगुडेम गावातील सर्व महिलांनी एकत्र येऊन रेशीम शेतीचा हा प्रयोग यशस्वी केला आहे. रेशीम अळीचे प्रजनन ही नाजुक गोष्ट आहे. अळ्यांच्या खाद्यासाठी मोठ्या प्रमाणात तुतीच्या झाडांची लागवड करावी लागते. तुतीची लागवड करून अळ्यांची पैदास घेणे यापासून तर ते बाजारात विक्रीसाठी पाठवण्यापर्यंतची सर्व कामे नादिगुडेमच्या महिला करतात. त्यांच्या रेशीम शेतीला सरकारची मान्यता देखील मिळाली आहे.