VIDEO भाषण देत असताना हृदयविकाराच्या झटक्याने स्वामीजींचा मृत्यू - Swamiji death heart attack Belgaum
बेळगाव - भाषण देत असताना बालोबाला मठाच्या स्वामीजीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू (Swamiji death heart attack) झाल्याची घटना जिल्ह्यातील बालोबाला गावात घडली. वाढदिवशीच त्यांचे निधन झाल्याने दुख व्यक्त केले जात आहे. संगनबसवा (वय 53) असे स्वामीजीचे नाव आहे. ही घटना 6 नोव्हेंबरला घडली होती, मात्र ती आता समोर आली आहे. 6 नोव्हेंबरला संगनबसवा महास्वामीजी यांचा वाढदिवस होता, या दिवशी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. येथे व्यासपीठावर खुर्चीवर बसून भाषण देत होते तेव्हा अचानक ते खाली पडले. या घटनेचे दृश्य कार्यक्रमाला उपस्थित भाविकांच्या मोबाईलमध्ये कैद झाले होते.