Subhash Desai Resolution 2022 : 'रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करुन देणे हाच संकल्प' - उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचा नवीन वर्षे संकल्प
मुंबई - नवीन वर्षामध्ये आमचा संकल्प आहे, की आयटी क्षेत्रामध्ये अधिकाधिक रोजगार उपलब्ध करणे. सुमारे 35 हजार तरुण-तरुणींना आयटी क्षेत्रात रोजगार निर्माण होईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपल्याकडे भरपूर मुले हे आयटी क्षेत्रातील ज्ञान घेत आहेत. विशेष करून कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक या क्षेत्रात त्यांचा मोठा कल दिसून येतो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कौशल्य विकास करून आपण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराभिमुख प्रशिक्षण देत आहोत. या मुलांसाठी रोजगाराची संधी आम्ही इलेक्ट्रॉनिक्स पार्कच्या माध्यमातून निर्माण करीत आहोत. छोट्या छोट्या उद्योजकांना आणि महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला दोन पैसे जास्त चांगले मिळू शकतील, असा आमचा प्रयत्न आहे. शिवाय औरंगाबाद जवळ बिडकीन येथे प्रक्रिया केंद्र आम्ही उभे करीत आहोत. या माध्यमातूनही रोजगार उपलब्ध करून देण्याचा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे, अशी भावना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली आहे.