चालत्या फिरत्या शाळेतून ज्ञानार्जन करणारे शिक्षक चंद्रहास श्रीवास्तव
कोरोना काळात सगळं काही ठप्प झालंय. व्यवयासापासून ते शाळा महाविद्यालयं बंद झालीत. शाळा बंद झाल्यामुळे मुलं घरी बसली. ज्या लोकांना परवडत होतं ते ऑनलाइन क्लासच्या माध्यमातून शिकत होते मात्र गरीब विद्यार्थी हतबल होते. अशा मुलांसाठी देवदूत बनून आले सागर येथील शिक्षक चंद्रहास श्रीवास्तव. चंद्रहास शिक्षक असून बिछोरा गावात ड्युटी करतात. त्यानंतर ते फावल्या वेळेत शहरातील आणि गावातील विविध भागातील मुलांना शिकवतात. मुलं अंगणात आपआपल्या घरून गोणपाट आणून अंथरून बसतात. या सर्वांचा शिक्षणाचा खर्च चंद्रहास स्वतः करतात. कोरोनाच्या या महामारीत काहींनी तर या विपत्तीतही काही साध्य करायची संधी सोडली नाही. अनेकांनी या काळात जनसेवा केली तर अनेकांनी आपल्या व्यवसाय वाढवला. या अशा कठीण वेळीही मास्तर चंद्रहास सारख्या लोकांमुळे देश समोर जातोय. पाहुयात हा खास रिपोर्ट...