महाराष्ट्र

maharashtra

'ज्युनियर पिकॉक मॅन' कान्हु बेहेराचं मोरांशी आहे अनोखं नातं

By

Published : Dec 2, 2020, 10:52 PM IST

भुवनेश्वर (ओडिसा) - ए राजा ये बाहेर, बाहेर ये राजा... असं म्हणत फक्त एकदा हाक मारल्यानंतर जंगलातून अनेक मोर त्याच्याकडं धावत येतात.. ते त्यांच्या प्रिय व्यक्तीच्या आज्ञेचं पालन करतात आणि त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवतात. जेव्हा-जेव्हा तो त्यांना बोलावतो तेव्हा ते येऊन त्याने दिलेले खाद्य आनंदानं खातात. ते त्याच्याबरोबर नाचतात आणि कुटुंबाप्रमाणं त्याच्याबरोबर वेळही घालवतात. तो गेल्यावर ते निघूनही जातात... ओडिसाची राजधानी भुवनेश्वरपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर असलेल्या नारजमध्ये एक व्यक्ती आणि मोर यांच्यात कधीही न संपणारं प्रेम दिसून येतं.. कान्हु बेहेराला मयूर खोऱ्यातील 'ज्युनियर पिकॉक मॅन' म्हणून ओळखलं जातं. तो पाणू बेहेरांचा नातू आहे, ज्यांना पूर्वी ओडिशाचा 'पिकॉक मॅन' म्हणून ओळखलं जायचं. १९९९ साली आलेल्या भयानक चक्रीवादळानंतर (सुपर साइक्लोन) तीन मोर पाणू यांच्या संपर्कात आले आणि पाणू यांनी त्यांना वाचवले. हळूहळू या वन्य पक्ष्यांविषयी पाणूंचे प्रेम वाढत गेलं आणि मोरांची संख्याही वाढू लागली. दरम्यान, 26 मे 2017 रोजी पाणू यांचा मृत्यू झाला. मोरांविषयी आजोबांचे असलेले प्रेम पाहून कान्हूने त्याच दिवशीपासून या वन्य पक्ष्यांची जबाबदारी घेण्याचे ठरवले.

ABOUT THE AUTHOR

...view details