कोरोनाची आणखी नवी रुपं येणार समोर; एनटीडीसीच्या संचालकांनी व्यक्त केली भीती - ईटीव्ही भारत सुदीप सिंह
भोपाळ : देशात सध्या दुसरी कोरोना लाट आली आहे. महाराष्ट्र, पंजाब यांसह इतर राज्यांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे. यासंदर्भात ईटीव्ही भारतचे मध्य प्रदेश ब्युरो चीफ विनोद तिवारी यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल चे (एनटीडीसी) प्रमुख डॉ. सुदीप सिंह यांच्याशी खास चर्चा केली. यावेळी सुदीप यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, कोरोनाची आणखी रुपं (म्युटेशन्स) समोर येणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली...