रंगांची उधळण करण्यास मथुरा सज्ज, पाहा VIDEO - होळी सण व्हिडिओ
उत्तर भारतात होळीचा सण मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. तब्बल ४० दिवस चालणाऱ्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी देशभरातून तसेच परदेशातून लोक येतात. होळीचा सण जवळ येत असल्याने मथुरेत रंग तयार करण्याचे काम जोरात सुरू आहे. मथुरेत रंग तयार करणारे अनेक उद्योग आहेत. हरयाणा, दिल्ली, मध्यप्रदेश, पंजाबमध्ये रंगाची निर्यात केली जाते. पाहा याबाबतचा खास व्हिडिओ