यूपीच्या खासदाराकडून ध्वजारोहणाच्या वेळी घडली ही चूक, व्हीडीयो होतोय व्हायरल - SP workers forgot national anthem in moradabad
मुरादाबाद - आपल्या वादग्रस्च विधानामुळे सतत चर्चेत असलेले समाजवादी पार्टीचे पदाधिकारी डॉ. एसटी हसनयांनी ध्वजारोहणाच्या वेळेस राष्ट्रगीत गाण्यास विसरले. यामुळे नागरिकांनीच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राष्ट्रगीताचा अपमान करताना दिसत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात त्यांना सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागत आहे. गलशहीद ठाणे क्षेत्रात ध्वजारोहणासाठी पोहोचलेल्या डॉ. एसटी हसन यांच्याकडून ही अक्षम्य चूक घडली. खासदार आणि सपाचे कार्यकर्ते राष्ट्रगीत गाण्यासाठी उभे असताना, काही मोबाईल पाहत होते. यानंतर, 'जन गण मन' हे राष्ट्रगीत सुरू झाले. या दरम्यान खासदार आणि समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डी पी यादव, महानगर अध्यक्ष शेन अली सानू उपस्थित होते. त्यांनी कोणीही राष्ट्रगीत गायले नाही. हा व्हीडीयो सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.