कोरोना हा रोग घालवू, दुःख जीवनी कोणा नको... बारामतीकरांचे प्रबोधनात्मक गीत - बारामती पोलीस स्टेशन
बारामती - बारामतीतील कवी, गीतकार, संगीतकार म्हणून ओळखले जाणारे सुहास अष्टपुत्रे यांनी प्रसिद्ध कवी आनंद फंदी यांच्या चालीवरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रबोधनात्मक गीत रचना केली आहे. 'कुटुंबातील तीन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मनात प्रचंड तणाव होता. मुळातच कवी मन असल्याने ही दाहक परिस्थिती शब्दबध्द करण्याची संकल्पना मनामध्ये होती. त्याच दरम्यान बारामती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची भेट झाली व त्यांनी कोरोना जनजागृतीपर गीत लिहावे असे मत मांडले व मी हे गीत लिहीले. यात मला माझे कुटुंबीय, संपुर्ण पोलीस दल व विशेष सहकार्य आर्मीचे निवृत्त अभय निंबाळकर यांनी केले आहे,' असे कवी सुहास अष्टपुत्रे यांनी सांगीतले आहे.
Last Updated : May 10, 2021, 12:38 PM IST