केरळचा सर्पमित्र; ज्याला बघताच साप शिस्तीत वागतात - केरळचा सर्पमित्र
केरळच्या बिनीश कुमार या व्यक्तिचं आयुष्य गेल्या अडीच दशकांपासून सांपांशी एकदम घट्टपणे जोडलं गेल आहे. बिनीश कुमार ज्या पलक्कड जिल्ह्यातील चेरुपुलास्सेरी भागात राहतात, तिथं अनेक विषारी साप आढळतात. मात्र, कोबरा असो किंवा किंग कोबरा.. सर्व साप बिनीश कुमार यांच्या समोर एखाद्या शिस्तप्रिय विद्यार्थ्यासारखे राहतात. बिनीश यांनी आतापर्यंत हजारो सापांना वाचवल आहे. 100 पेक्षा जास्त किंग कोबरांना पकडून जंगलात सोडल आहे. त्यांना दोनदा सर्पदंश होऊन ते मरता-मरता वाचले आहेत. मात्र, तरीही त्यांनी सापांसाठी काम करणं सोडल नाही. आता तर ते आपल्या दोन मुलांनाही सांप पकडण्याचं अन् त्यांची देखभाल करण्याच प्रशिक्षण देत आहेत.