शिवसेनेची वाटचाल काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या दिशेने - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis in goa
गोवा - मागच्या काही वर्षात शिवसेनेची भूमिका बदलली असून, त्यांची वाटचाल शिवसेना पॅटर्न सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विचारांच्या दिशेने होत असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच भाजपने आपल्या सत्तेच्या कारकिर्दीत अधुनिक गोव्याची निर्मिती केली असून, मनोहर पर्रिकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत. त्यांच्या कारकिर्दीत गोव्याच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली गेल्याचे गोव्याचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.