मुस्लिम महिला करतेय हिंदू स्मशानभूमीची देखभाल! - Shahnoor Begum Hindu cemetery maintenance
हैदराबाद - आपला देश धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करणारा देश आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी धार्मिक असहिष्णुता पसरवली जात असल्याचे आपल्याला दिसते. अशा या वातावरणात आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील एक मुस्लिम महिला, धार्मिक सद्भावना आणि एकोपा वाढवण्याचे काम करत आहे. शहानूर बेगम असे या महिलेचे नाव आहे. त्या गेल्या ३० वर्षांपासून हिंदू स्मशानभूमीच्या देखभालीचे काम करतात. आपली सकाळची नमाज अदा केल्यानंतर शहानूर कामावर येतात. हातात झाडू आणि टोपली घेऊन तेनपूर गावातील 'शांतिवन' स्मशानभूमीत जातात. त्या स्मशानभूमीत दररोज साफ-सफाई करण्याचे काम त्या करतात. गेल्या तीस वर्षात त्यांच्या या दिनक्रमात काहीही बदल झालेला नाही.