VIDEO: नंदीग्राममध्ये कार्यकर्त्यांनी अमित शाहांच्या पायांना केला स्पर्श, तर मोदी स्वतः कार्यकर्त्यांच्या पडले पाया - bjp workers touched pm modi feet
कोलकाता - निवडणूक रॅलीच्या दरम्यान कोणी कोणाच्या पाया पडल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो. अलीकडेच पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या जाहीर सभेत स्थानिक नेते पंतप्रधान मोदींच्या पायाजवळ पोहोचले. मात्र, पंतप्रधानांनी त्यांना थांबवत जमिनीवर बसून स्वत: त्यांच्या पाया स्पर्श पडले. पुन्हा तसेच काहीसे घडले आहे. नंदीग्राममधील रोड शोसाठी हेलिकॉप्टरमधून उतरताच काही कार्यकर्त्यांनी अमित शहांच्या पायांना स्पर्श केला. यावेळी अमित शहा यांनी त्या कार्यकर्त्यांना थांबवले नाही आणि कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नाही.