हॉकीची 'मक्का' म्हणून ओळखले जाणारे पंजाबमधील संसापूर गाव - संसापूर गाव लेटेस्ट न्यूज
हैदराबाद - पंजाबच्या जालंधरमधील संसापूर गावाला हॉकीची 'मक्का' म्हणून ओळखले जाते. या गावाला हॉकीचा गौरवशाली इतिहास लाभला आहे. जो व्यक्ती या गावाचा इतिहास ऐकतो त्याला या गावाबद्दल नक्कीच गर्व वाटतो. कारण संसापूर गावाने आतापर्यंत १४ ऑलिम्पिक खेळाडू दिले आहेत. या खेळाडूंनी मोठ-मोठ्या स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत २७ पदके जिंकली आहेत.