VIDEO : 'आयएमए ख्रिश्चनांचे दलाल, तर मदर तेरेसा होत्या चेटकीण'; साध्वी प्राची कडाडल्या - साध्वी प्राची स्टेटमेंट
हरिद्वार : अॅलोपॅथी डॉक्टर आणि रामदेव बाबा यांच्यामधील वाद संपुष्टात येत नाहीये. त्यातच आता भाजपा नेत्या साध्वी प्राची यांनीदेखील या वादात उडी घेतली आहे. त्यांनी आयएमए हे ख्रिश्चन धर्मीयांचे दलाल असल्याचे म्हटले आहे. तसेच, मदर तेरेसा यांनादेखील चेटकीण म्हणत, हा सर्व हिंदूंना धर्मांतर करायला लावण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आहे. पाहा काय म्हणाल्या साध्वी प्राची...