भारत-चीन तणाव : विंग कमांडर मेजर प्रफुल बख्शी यांची विशेष मुलाखत... - india china news live
भारत आणि चीनच्या सीमेवरील तणाव वाढतच जाताना दिसून येत आहे. लडाखच्या गॅलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यादरम्यान झटापट झाली. यामध्ये एका अधिकाऱ्यासह दोन जवानांना वीरमरण आले. याच पार्श्वभूमीवर, ईटीव्ही भारतचे वृत्तसंपादक निशांत शर्मा यांनी विंग कमांडर (रि.) मेजर प्रफुल्ल बख्शी यांच्याशी चर्चा केली आहे. यामध्ये बख्शींनी सांगितले, की भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये विविध स्तरांवर चर्चा सुरू आहेत. अशा प्रकारची झटापट होणे, हे जिनिव्हा कन्वेंशनचे उल्लंघन आहे. तसेच भारताने चीनच्या पाच सैनिकांचा खात्मा केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. पहा ही संपूर्ण मुलाखत...