जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा - उमर अब्दुल्ला - पंतप्रधान मोदी बातमी
नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला पूर्ण स्वरुपात राज्याचा दर्जा मिळावा ही मुख्य मागणी असल्याचे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री तथा जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी सांगितले. जम्मू काश्मीरमधील सर्व राजकीय पक्षांची ऐतिहासिक अशी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पार पडली. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह यांच्यासह जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा उपस्थित होते. ही बैठक सुमारे साडेतीन तास चालली. त्यानंतर उमर अब्दुल्ला यांनी माध्यमांंसमोर आपली प्रतिक्रिया दिली.
Last Updated : Jun 25, 2021, 4:21 AM IST