वेलकम २०२१ : राष्ट्रपती भवनासह संसद परिसरात आकर्षक रोषणाई - राजधानी दिल्ली नववर्षासाठी विद्युत रोषणाई
नवी दिल्ली - नव्या वर्षाच्या स्वागतासाठी संपूर्ण देश सज्ज झाला आहे. राजधानी दिल्लीत न्यू इअरच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन आणि संसद परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण संसद परिसर उजळून निघाला आहे. कोरोना महामारीमुळे नव्या वर्षाच्या स्वागतावर बंधने आली असून अनेक राज्यांनी नाईट कर्फ्यू लागू केला आहे. मात्र, तरीही २०२१ च्या स्वागतासाठी संपूर्ण देशात जल्लोष पाहायला मिळत आहे.