आमच्या देशात काय चाललंय आम्ही बघू; पॉप सिंगरने यात पडू नये - आठवलेंची रिहानावर टीका - रामदास आठवले रिहाना टीका
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पॉप सिंगर रिहानाने देशातील शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर त्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, यांनीही यावरुन रिहानावर हल्ला केला आहे. एका पॉप सिंगरने राजकारणात पडू नये, तसेच आमच्या देशात काय चाललंय आम्ही बघून घेऊ अशी टीका त्यांनी तिच्यावर केली आहे. यासोबतच, हा आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत सरकारला बदनाम करण्याचा डाव असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. पाहूयात नक्की काय म्हणाले आठवले...