अजगराने गिळलं चक्क श्वानाला...पाहा व्हिडिओ - अजगराने गिळले सापाला
आंध्रप्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यातील उय्यलावाडा गावातील एका अजगराचा व्हिडिओ चांगलाच प्रसिद्ध होत आहे. या अजगराने श्वानाला गिळल्याने त्याला जागेवरून हलता येत नव्हते. सुस्तावलेल्या अजगराला पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी त्याला कुंडू नदीत सोडून दिले. गावकऱ्यांनी त्याला दोरीने देखील बांधले होते. दोरीने ओढत नेऊन काठीच्या सहाय्याने त्याला जवळील नदीत सोडून दिले. वनअधिकाऱ्यांना न बोलवता गावकऱ्यांनी पसस्पर अजगराला नदीत सोडून दिल्याने अनेकांनी संतापही व्यक्त केला आहे.