महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

कृषी कायद्याविरोधात पंजाबात शेतकरी आक्रमक, दिल्ली अमृतसर महामार्ग रोखला - punjab farmers protest

By

Published : Oct 4, 2020, 5:09 PM IST

केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी कायदे आणले आहेत. या कायद्यांना पंजाब राज्यातून मोठा विरोध होत आहे. संपूर्ण राज्यात या विरोधात आंदोलन सुरू आहे. वादग्रस्त कायद्यांचा विरोध करत शिरोमणी अकाली दल केंद्रातील सत्ताधारी एनडीए आघाडीतून बाहेर पडला आहे. पक्षाच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यात सगळीकडे या कायद्याविरोधात लोन पसरले असले असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज राज्यात आंदोलकांना पाठिंबा देत ट्रॅक्टर रॅली देखील आयोजित केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details