पुलवामा होतेय काश्मीरमधील 'आणंद' - पुलवामा दुध उत्पादन न्यूज
हैदराबाद - काश्मीर म्हटले की आपल्याला बर्फाळ भूमी किंवा खोऱ्यातील तणाव आठवतो. मात्र, काश्मीरमधील एक जागा दुध उत्पादनाच्या क्षेत्रात आपली ओळख बनवू पाहत आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्हा दुग्ध उत्पादनासाठी नावारुपाला येत आहे. त्यामुळे त्याला काश्मीरमधील 'आणंद' असेही म्हटले जाते. पुलवामामध्ये दररोज 8 लाख 5 हजार लीटर दुध उत्पादन होते. दक्षिण बनिहाल व उत्तर काश्मीरातील विविध ठिकाणी हे दुध पाठवले जाते.
Last Updated : Jan 16, 2021, 7:48 AM IST