छत्तीसगड..इथल्या भिंतीही मुलांचा अभ्यास घेतात..
छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यातील नरहरपूर गावातील ग्रामपंचायतीची प्रत्येक भिंत तुम्हाला शाळेतील फळ्यासारखी दिसून येईल. नजर फिरवली तर कुठं तुम्हाला म्हणी लिहलेल्या दिसतील. तर कुठं इंग्रजीची बाराखडी, तर कुठं मुलं तुम्हाला गणित शिकताना दिसतील, तर कुठं फळांची नावं वाचताना. करोनाच्या काळात शाळा बंद आहेत. मात्र, मुलांच्या अभ्यासावर याचा परिणाम होऊ नये म्हणून नरहरपूर ग्रामपंचायतीने हा उपाय शोधून काढलाय. गावातील चौकात, गर्दीच्या ठिकाणी किंवा जिथं मुलांचं येणं- जाणं अशा ठिकाणच्या भिंतीवर अक्षरे, अंक, फळांची नावं रेखाटण्यात आली आहेत. भितींवरील रंगीत अक्षरे बघून मुलं थांबतात आणि वाचू लागतात. त्यामुळे खेळता खेळताही मुलांचा अभ्यास होतोय.
Last Updated : Apr 19, 2021, 7:23 PM IST