पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्रीय नेत्यांकडून अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली - अटल बिहारी वाजपेयींना आदरांजली
नवी दिल्ली - देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज (सोमवार) पुण्यतिथी आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांनी वाजपेयींना 'सदैव अटल' या स्मृतिस्थळी आदरांजली वाहिली. आदारंजली वाहण्यासाठी भाजपाचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात जमले होते.