पोलिसांनी मनसोक्त डान्स करत घालवला ड्यूटीवरील तणाव - पोलीस डान्स
भोपाळ - देशात कोरोना महामारीमुळे आरोग्य आणीबाणी निर्माण झाली आहे. या काळात लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वाचे काम पोलिसांकडे आहे. मात्र, अतिरिक्त कामाच्या ताणामुळे पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण वाढले आहे. अशातच काही समाज कंटकांकडून ड्यूटीवर असलेल्या पोलिसांवर हल्ले होत आहे. हा सगळा ताण कमी करण्यासाठी मध्यप्रदेशातील पोलीस बॉलिवूड गाण्यांवर मनसोक्त नाचले. ज्या हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, तेथे त्यांनी डान्स करत तणाव कमी केला.