चलो दिल्ली : आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांचा अश्रूधुर आणि पाण्याचा वापर - शेतकरी आंदोलन बातमी
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघटनांनी आवाज उठवला असून आंदोलन पुकारले आहे. लाखो शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले असून दिल्लीकडे कूच करत आहेत. मात्र, प्रशासनाने या आंदोलनाला परवानगी दिली नसून दिल्लीत न येण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे. मात्र, शेतकरी दिल्लीकडे निघाले असून पोलीस त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा आणि पाण्याचा वापर केला. हरयाणातील कर्नाल शहरातील पाहा व्हिडिओ