कोरोनाबद्दल जनजागृती करणारे 'पोलीस मित्र'
हैदराबाद - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वाचं पालन करण्यासाठी पोलीस लोकांना जागरूक करत आहेत. लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांचा वाढता कामाचा ताण पाहता राजस्थानातील डुंगरपूरमध्ये पोलीस मित्र खांद्याला खांदा लावून काम करताऐत. विशेष म्हणजे, कोरोनाच्या संकटात राजस्थानमध्ये प्रथमच महिला पोलीस मित्रही रस्त्यावर उतरले आहेत. डुंगरपूरमधील कडक उन्हात या 6 पोलीस मित्र आपले कर्तव्य चोखपणे पार पाडत आहेत. पोलीस मित्रासाठी एक खास ड्रेसकोड देखील आहे, जेणेकरून त्यांची सहज ओळख होईल. त्यांना ओळखपत्रही मिळाले आहे, त्यांच्या टी-शर्टमध्ये पोलीस मित्र लिहिलं असून पोलीस ठाण्याचाही उल्लेख करण्यात आलाय. कोरोना महामारीमुळे प्रत्येकजण घाबरलेला आहे परंतु या महिला स्त्री शक्ती एका योद्धाप्रमाणे काम करतायत. कोरोना या काळात मुली घराबाहेर पडताना दिसत आहेत आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसांप्रमाणे काम करताना दिसत आहेत. सामान्यत: मुली घराच्या बाहेर निघत नाही परंतु डूंगरपूरच्या या 6 मुलींनी पोलीस मित्र बनून एक नवा आर्दश लोकांपुढे ठेवलाय. पाहुयात हा खास रिपोर्ट..