झारखंडमध्ये पोलीस आणि स्थानिकांमध्ये 'राडा'; पोलिसांवर दगडफेक, कित्येक जखमी.. पाहा व्हिडिओ! - झारखंड पोलीस दगडफेक व्हिडिओ
रांची : झारखंडच्या साहिबगंजमध्ये एका गावात स्थानिक आणि पोलिसांमध्ये तुफान झटापट झालेली पहायला मिळाली. बरारी गावातील रहिवाशांनी गावातल्या अवैध दारुच्या दुकानाची तोडफोड करुन, दारु पेटवून दिली. यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही गावकरी थांबत नसल्याचे पाहताच पोलिसांनी जबरदस्ती त्यांना तेथून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक करत, त्यांच्या वाहनांचीही तोडफोड केली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. या सर्व गदारोळात कित्येक नागरिक आणि पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे...